मुंबई - अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यात सध्या नोकझोक सुरू असल्याची चर्चा आहे. सर्व कार्यक्रमात एकत्र दिसणारे हे प्रेमी जोडपे सध्या पार्टी आणि अॅवॉर्ड फंक्शनमध्ये वेगवेगळे जाताना दिसत आहेत. शाहीद कपूरच्या बर्थ डे पार्टीत दोघेही वेगवेगळे आले. तसेच व्हॅलेंटाईन डे ला देखील दोघे एकत्र नव्हते. त्यामुळे दोघांच्यात काही तरी बिनसले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
"मी सध्या माझ्या कामाकडेच लक्ष देणार आहे आणि हे कामावरील प्रेम तुमच्या जवळच्या व्यक्तीला समजत नसेल तर हे चुकीचे आहे," असे दीपिकाने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. दीपिकाच्या या उत्तरामुळे दीपिका-रणवीरच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.