Advertisement

माई-वसुधाचं ‘बिग बॉस’ मध्ये स्वागत !


माई-वसुधाचं ‘बिग बॉस’ मध्ये स्वागत !
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉसच्या घरामध्ये  मंगळवारी ‘घाडगे & सून’ या मालिकेतील माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक येणार आहेत. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच आनंद होणार आहे. शर्मिष्ठा सुकन्याताईना बघून भावूक झाल्याचं दिसेल. या दोघी आतमध्ये गेल्यानंतर बरीच धम्माल मस्ती होणार हे तर नक्कीच.


झोप फक्त ८ तासच

घरातील सदस्यांना सोमवारी आगळावेगळा टास्क मिळाला. बिग बॉसच्या घरातील एक महत्वाचा नियम शिथिल करण्यात आला. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी दिली. पण यामध्ये बिग बॉस यांनी एक अट घरातील सदस्यांना घातली. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तासच होता.


कोण बाहेर जाणार ?

सोमवारी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सई, मेघा आणि स्मिता तर दिलेलं सिक्रेट कार्य शर्मिष्ठा आणि नंदकिशोर यांनी पार न पाडल्यामुळे ते दोघेही नॉमिनेट झाले. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडणार हे पाहायचं आहे.

घरोघरी मातीच्या चुली

बिग बॉस सदस्यांना एक टास्क देणार आहेत. संसार म्हंटलं कि, भांड्याला भांडं हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू–सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणं स्वाभाविक आहे. बिग बॉसमध्ये “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यानिमित्त नात्यातील अशीच एक गंमत बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये मेघा पुष्करला बरीच अतरंगी कामं देणार आहे. जसं स्विमिंग पूलच्या पाण्यानं बादली भरणं ज्यासाठी मेघा पुष्करला एक छोटेसं झाकण देणार आहे. तर सईला शर्मिष्ठा आणि नंदकिशोर आस्तादला काही वेगळीच कामं देणार आहेत. आता ही काम घरातील सदस्य कशी पूर्ण करतील हे बघणे रंजक असणार आहे.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा