सनी लिओनी आली, पण 'बॉईज'ना नाराज करून गेली!


SHARE

बॉलिवूडमध्ये सनी लिओनीने साकारलेल्या भूमिकांना हिंदीसोबतच मराठी प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं. पण आता सनी लिओनी मराठी सिनेमात भूमिका साकारणार आहे! होय. आगामी 'बॉईज' या मराठी सिनेमामध्ये सनी लिओनीने एक आयटम साँग केलं आहे. या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. 

सनी लिओनी येणार हे कळताच तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे सनी लिओनी आलीही. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्येच तिनं कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे सनी आली पण 'बॉईज'ना नाराज करूनच गेली असंच म्हणावं लागेल.


सनी लिओनीला भेटता न आल्याचं दु:ख तिच्या चाहत्यांसोबतच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनाही झालं. "खरंतर मी सनी लिओनीला जवळून पहायला आलो होतो. पण सनी आणि माझी भेटच झाली नाही. यासाठी मी माझ्या ड्रायव्हरला खूप शिव्या घातल्या. सनी आय मिस्ड यू!" असं मिश्किलपणे म्हणत सुरेश वाडकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.हेही वाचा

मानसी म्हणतेय ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
ताज्या बातम्या