Advertisement

स्वप्नील जोशी प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म

स्वप्नील जोशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिलीय.

स्वप्नील जोशी प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म
SHARES

स्वपीन जोशी प्रेक्षकांसाठी स्वत:च ओटीटी प्लॅटफॉर्म घेवून येत आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी असणार आहे.

हिंदी, मराठी, बंगाली आणि प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका या ओटीटीवर पाहायला मिळतील. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. स्वप्नील जोशी आणि नरेंद्र फिरोदिया गेल्या दीड वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करत होते.

स्वप्नील जोशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिलीय. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “मार्च २०२० सालात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सगळं ठप्प पडलं. आता पुढे काय असे विचार सतत डोक्यात येत होते. अखेर दीड वर्षांनंतर त्या कायचं उत्तर मिळालं. माझी कंपीन टमोरा डीजीवर्ल्ड लवकरच प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत असल्याचं सांगताना खूप आनंद होतोय. होय तुम्ही बरोबर वाचलतं. आम्ही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत.”

पुढे तो म्हणाला, “या रोमांचक प्रवासात नरेंद्र फिरोदिया सारखे पार्टनर माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे. लेटफ्लिक्ट नावाचं एक ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. आता लेटफ्लिक्स आणि टमोरा डिजीवर्ल्ड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आता आम्ही एकत्रीतपणे एक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी लॉन्च करत आहोत याचा मला आनंद आहे.”हेही वाचा

...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले

‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा