Advertisement

'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीतही

नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडनं तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मराठीत सादर करण्याची घोषणा केली आहे. मराठीतल्या मालिकेचं काय नाव आहे? आणि कधीपासून प्रसारीत होणार यासाठी संपूर्ण बातमी वाचा...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीतही
SHARES

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आता ही मालिका मराठीत देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हो... अगदी बरोबर वाचलंत तुम्ही... 

नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडनं तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मराठीत सादर करण्याची घोषणा केली आहे. ‘गोकुळधामची दुनियादारी’ असं या मराठी नालिकेचं नाव आहे. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यापासून ही मालिका फक्त मराठी या चॅनलवर प्रसारीत होणार आहे. हा शो मूळचा डब व्हर्जन आहे.


महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मिळालेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर प्रॉडक्शन हाऊसनं मराठी भाषेत मालिका प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला. गोकुळधाची दुनियदारी सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल.

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाचे निर्माते आणि नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असित कुमार मोदी म्हणाले, आमच्या शोचा मराठीत शुभारंभ झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. फक्त मराठी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांपैकी एक आहे. याआधी, तारक मेहता का उल्टा चष्मा तेलुगू भाषेत देखील प्रसारीत झाला आहे. 'तारक मामा अय्यो रामा' या नावानं तेलुगू भाषेत आलेली ही मालिका चांगली चालली. मराठी भाषेतील मालिका देखील चांगली चालेल याचा मला विश्वास आहे.”




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा