10 मार्चला 'तलाव' सिनेमागृहात

Dadar , Mumbai  -  

दादर - एस.एम व्ही फिल्म्स निर्मित 'तलाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची पत्रकार परिषद दादरच्या प्लाझा सिनेमा थिएटरच्या मिनी सभागृहात झाली. या सिनेमात अभिनेता सौरभ गोखले, संजय खापरे तसंच या सिनेमाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री प्रियांका राऊत, वर्षा पवार, ऐश्वर्या असे बरेच कलाकार पाहायला मिळतील. सिनेमाचे निर्माते नवनीत फोंडके आणि दिग्दर्शक जयभीम कांबळे यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सौरभ आणि प्रियांका ही नव्या जोडीची गंमत आपल्याला अनुभवता येणार आहे. तर, अभिनेता संजय खापरे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. येत्या 10 मार्चला प्रदर्शित होणारा तलाव हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Loading Comments