Advertisement

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'हा' कलाकार कोरोना पॉझिटिव्ह,

सध्या संपूर्ण टीम चिंतेत आहे. कारण टीमनं नुकतंच त्याच्यासोबत शूट केलं होतं.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'हा' कलाकार कोरोना पॉझिटिव्ह,
SHARES

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील दयाबेनचा भाऊ सुंदरलाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सुंदरलाल तसं पाहायला गेलं तर शोमध्ये कधीतरीच दिसतो. पण सध्या संपूर्ण टीम चिंतेत आहे. कारण टीमनं नुकतंच त्याच्यासोबत शूट केलं होतं.

सुंदरलालच्या भूमिकेनं प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. जेठालाल आणि सुंदरलाल यांची दमदार केमिस्ट्री शोमध्ये पाहायला मिळते. सुंदरलालनं आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

पण आता दयाबेनचा भाऊ सुंदरलाल म्हणजेच अभिनेता मुर वकानी याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे ‘तारक मेहता’च्या टीमची चिंता वाढली आहे.

सुंदरलाल म्हणजेच मयुर वकानी हा दयाबेन म्हणजेच दिशा वकानीचा रिल आणि रिअल भाऊ सुद्धा आहे. पण आता सुंदरलालचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण टीम चिंताग्रस्त आहे.

काही काळापूर्वीच सर्वांनी सुंदरलालसोबत शूटिंग सुद्धा केलं होतं. त्यामुळे आता पूर्ण टीमला आपली करोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. जर आणखी कोणत्या सदस्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ही गोष्ट टीमसाठी मोठी समस्या उभी करू शकते.



हेही वाचा

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा