बॉलिवुडची 'सिमरन' लवकरच तुमच्या भेटीला

Mumbai
बॉलिवुडची 'सिमरन' लवकरच तुमच्या भेटीला
बॉलिवुडची 'सिमरन' लवकरच तुमच्या भेटीला
See all
मुंबई  -  

वेगळ्या धाटणीचे सिनेमे साकारणारी अभिनेत्री अशी कंगना रणौतची ओळख. तनू वेड्स मनू, क्वीन आणि रंगून या चित्रपटातील दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी कंगना आणखी एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात झळकणार आहे. कंगना लवकरच 'सिमरन' या चित्रपटा द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटात कंगना 'सिमरन' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टिझर रविवारी रात्री प्रदर्शित करण्यात आला.

या टिझरमध्ये कंगना एकदम अल्लड वाटत आहे. आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. एनआरआय नर्स संदीप कौरच्या आयुष्यावर सिमरन सिनेमाची कथा आधारीत आहे. कंगनानं स्वत: या सिनेमाची कथा लिहली आहे. 15 सप्टेंबरला ही अल्लड 'सिमरन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.