'मांजा'चं टीजर पोस्टर प्रदर्शित

 Mumbai
'मांजा'चं टीजर पोस्टर प्रदर्शित
Mumbai  -  

मुंबई - अश्विनी भावे यांच्या ‘मांजा’ या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. चित्रपटाच्या टीजर पोस्टरनंतर आता 'मांजा'बाबत अश्विनीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन जतिन वागळे यांनी केलं आहे. इंडिया स्टोरीज निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावेसोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली आहे यात शंकाच नाही.

Loading Comments