Advertisement

'कबीर सिंग' चित्रपटाच्या निर्मात्यानं घेतले ‘मास्टर’ चित्रपटाचे हक्क

'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

'कबीर सिंग' चित्रपटाच्या निर्मात्यानं घेतले ‘मास्टर’ चित्रपटाचे हक्क
SHARES

तामिळ अभिनेता थलपती विजयचा चित्रपट 'मास्टर’नं पहिल्याच दिवशी चांगला गल्ला जमवला. पहिल्याच दिवशी चित्रपटानं कमाईचा विक्रम केला. वर्ल्डवाइड या चित्रपटानं ५३ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. आता या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे.

'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी 'मास्टर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते.

त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तामिळनाडूत निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू आहेत. मात्र तरीदेखील 'मास्टर’ या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला. चित्रपटानं केवळ तामिळनाडूत पहिल्या दिवशी २५ कोटी कमावले. तर, देशभरात सुमारे ४२ कोटींचा व्यवसाय केला.

परदेशातही पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. केवळ ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवशी २.४८ लाख डॉलर (१.८२ कोटी) कमाई झाली आहे. तिछं पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला. हिंदी, तेलुगू आणि कानडीतही चित्रपट डब करण्यात आला आहे. ओव्हरसीजमध्ये एकुण ११ कोटींचा व्यवसाय या चित्रपटानं केला आहे.

तिकीट बुकिंग साइट ‘बुक माय शो’चे आशिष सक्सेना म्हणाले, ‘मास्टर’ हा चित्रपट लॉकडाऊननंतर तिकीट खिडकीवर गर्दी खेचणारा पहिला चित्रपट आहे, यात वाद नाही. एक लाखाहून अधिक अॅडव्हान्स बुकिंग आमच्याकडे आहे. निर्माते गिरीश जोहर म्हणाले, बॉक्स ऑफिसला यामुळे दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा

विराटनं अनुष्का शर्मा असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत केली वाढ

अमिताभ म्हणतात, "आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे"

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा