Advertisement

विराटनं अनुष्का शर्मा असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत केली वाढ

विराट-अनुष्कानं गोपनीयतेच्या कारणास्तव, रूग्णालयातील सुरक्षा वाढवली आहे.

विराटनं अनुष्का शर्मा असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत केली वाढ
SHARES

नुकतेच एका बालिकेचे पालक बनलेली अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. विराट-अनुष्कानं गोपनीयतेच्या कारणास्तव, रूग्णालयातील सुरक्षा वाढवली आहे.

वृत्तानुसार, मुलीच्या जन्माच्या ठिकाणी मुंबईच्या रुग्णालयात या जोडप्याने कडक निर्बंध घातले आहेत. विराट-अनुष्कासुद्धा कोणाकडूनही भेट स्वीकारत नाहीत. या व्यतिरिक्त, जवळच्या नातेवाईकांना देखील रुग्णालयात भेट घेण्याची परवानगी नाही. रूग्णालयाच्या आजूबाजूच्या खोल्यांना भेट देणार्‍या लोकांनाही मुलगी पाहण्याची परवानगी नाही.  

विराटनं सोशल मीडियावर मुलगी झाल्याची माहिती दिली होती. त्यानं लिहलं होतं की, मुलगी झाल्याची बातमी देताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही ठीक आहेत आणि या जीवनाचा हा अध्याय अनुभवण्याची संधी मिळाल्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्हाला माहित आहे की आपण निश्चितपणे हे समजून घ्याल की यावेळी आपल्या सर्वांना काही गोपनीयतेची आवश्यकता आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा