Advertisement

…आणि चिन्मयने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित


…आणि चिन्मयने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित
SHARES

लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरनं एक अनोखा इतिहास रचला आहे. चिन्मयची भूमिका असलेले एक-दोन नव्हे तर तब्बल तीन सिनेमे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात दोन मराठी तर एक हिंदी सिनेमा आहे. यापूर्वी एखाद्या मराठी अभिनेत्याचे दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झाले असतील, पण एकाच अभिनेत्याचे दोन मराठी आणि एक हिंदी असे तीन सिनेमे प्रदर्शित होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ ठरली आहे.



फर्जंद, मस्का अाणि भावेश जोशी

लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या दिग्पाल लांजेकरचा ‘फर्जंद’ आणि अभिनयाकडून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रियदर्शन जाधवचा ‘मस्का’ या दोन मराठी सिनेमांच्या जोडीला दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘भावेश जोशी’ या हिंदी सिनेमात चिन्मयने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 


'जास्त विचार करत नाही'

‘फर्जंद’मध्ये चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ‘मस्का’मध्ये परितोष जैन नावाच्या तरुणाच्या, तर ‘भावेश जोशी’मध्ये एका भ्रष्ट पोलिसाच्या भूमिकेत समोर आला आहे. हे तीनही सिनेमे आपल्यासाठी महत्त्वाचे असले तरी त्यांचे क्लॅश टाळणं आपल्या हाती नसल्यानं न्यूट्रल असल्याचं चिन्मयने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं. खरं तर अभिनेता म्हणून हे तीनही सिनेमे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याने ते तीन वेगवेगळ्या शुक्रवारी प्रदर्शित व्हावेत, अशी इच्छा होती. पण जे आपल्या हाती नसते, त्याचा जास्त विचार न करणं योग्य असल्याचं चिन्मय म्हणतो.


हेही वाचा -

लेखक लेक मृणालवर भारी!

'बिग बॉस मराठी'त आणखीन एक वाइल्ड कार्ड एन्ट्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा