Advertisement

'बिग बॉस मराठी'त आणखीन एक वाइल्ड कार्ड एन्ट्री


'बिग बॉस मराठी'त आणखीन एक वाइल्ड कार्ड एन्ट्री
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकानंतर एक नवीन सदस्य येत आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि सदस्यांना दर आठवड्याला नवीन सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच त्यागराज खाडिलकर आणि शर्मिष्ठा राऊत यांची एन्ट्री झाली. आता अजून एका सदस्याची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एन्ट्री होणार आहे. आपल्या हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ज्यांना ओळखले जाते, ज्यांच्या कलर्स मराठीवरील कार्यक्रमातील 'पक्या भाई' या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली, असे नंदकिशोर चौघुले वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना माझी कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटेजी नसणार आहे. कारण या घरामध्ये त्याचा निभाव लागणार नाही. या घरामध्ये तुम्ही माणूस म्हणून कसे वागता? कसे रहाता यावर हा खेळ निर्धारित आहे. मला असं वाटतं या घरामध्ये खऱ्या स्वभावावर टिकून रहावं आणि स्वत:ला तपासावं.

नंदकिशोर चौघुले, अभिनेता


'मला कशाचीही भीती नाही'

घरामध्ये जाताना कशाची भीती वाटते आहे? असं विचारल्यास ते म्हणाले, “मला कशाचीही भीती वाटत नाही. कारण, लोकांमध्ये माझी प्रतिमा काय आहे, याचा मी कधीच विचार केला नाही. मी सादर करत असलेल्या पात्राची प्रतिमा नेहमीच जमली. पण, इथे स्वत: मीच असणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचे, घरामध्ये टिकून रहायचे, हेच माझे ध्येय असणार आहे”.


फायनलमध्ये काय होणार?

मेघा आणि सईबद्दल बोलताना चौघुले म्हणाले, "अंतिम सोहळ्याची मी तयारी करूनच आलो आहे आणि मेघा, सई आणि मला मी Top मध्ये बघतो. शर्मिष्ठा आणि भूषण हे जरी माझे जुने मित्र असले, तरी मी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुठलेही संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा मैत्रीचे नाते दृढ करण्यासाठी आलो नाही. मी चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट असेन."



हेही वाचा

ये आऊ नहीं, गब्बर है! बिग बॉस मध्ये होणार धमाल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा