Advertisement

बिग बॉसच्या घरात 'हे' सदस्य नॉमिनेट


बिग बॉसच्या घरात 'हे' सदस्य नॉमिनेट
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारी रेशम आणि मेघामध्ये सदस्यांनी बहुमताने रेशमला सुरक्षित करत मेघाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं.


काय म्हणाली मेघा?

मेघाचा मंगळवारी वाढदिवस होता, याच दिवशी तिला घरातील सदस्यांनी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. मेघाने पुष्करजवळ मनात दडलेल्या खूप गोष्टी बोलून दाखवल्या. रेशम आणि माझ्यामध्ये जर ठरवायचं झालं तर मीच सुरक्षित होणं अपेक्षित होतं असं मत तिनं व्यक्त करून तिची नाराजगी व्यक्त केली.

पुष्कर, सई, आऊ सगळ्यांवरच ती खूप चिडलेली होती, असं दिसून आलं. परंतु सई मात्र मेघाला वाचवण्यासाठी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसून आलं जे आस्तादने देखील मान्य केलं.


सईसुद्धा नॉमिनेट

यावेळी सईसुद्धा नॉमिनेट झाल्याने पुष्कर आणि मेघाशी बोलत नसल्याचं दिसून आलं. या आठवड्यामध्ये कोणताही सदस्य घराबाहेर जाणार नाही या गोष्टीशी घरातील सदस्य अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जे नॉमिनेट झाले आहेत त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. तर जे नाही झाले ते आनंदी आहेत.


मर्डर मिस्ट्री

मंगळवारी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “मर्डर मिस्ट्री" चा टास्क रंगला. या प्रकारचा टास्क या घरामध्ये पहिल्यांदाच खेळला जातो आहे. ज्यामध्ये आस्ताद काळे खुनी तर स्मिता आणि सुशांत गुप्तहेर आहेत. तर बाकीचे घरातील सदस्य सामान्य नागरिक आहेत. दरम्यान हा टास्क संपता संपता पुष्करचा खून झाला, असं बिग बॉसने घोषित केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा