अजय-अतुल केलेली मदत विसरलेत - अशोक पत्की

 Pali Hill
अजय-अतुल केलेली मदत विसरलेत - अशोक पत्की
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - ‘अजय-अतुल यांना सुरुवातीच्या काळात केलेली मदत ते विसरलेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत,' अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजय-अतुल या जोडीचे फक्त मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात चाहते आहेत. पण काही दिवसांपासून या जोडीचं नाव वेगळ्याच कारणांसाठी गाजतंय. आपल्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे आणि बेफाम संगीतामुळे रसिकांचं मन जिंकलेल्या या जोडीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली होती. औरंगाबादच्या वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचं सादरीकरण सुरू होतं. त्यावेळी अचानक साऊंड ट्रँक बंद पडला आणि गोंधळ झाला. अजय-अतुल गाणं गात नसून केवळ लीप मुव्हमेंट करत असल्याचा आरोप झाला आणि त्यावर बरीच चर्चा झाली. आता, पत्कींच्या वक्तव्यामुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

Loading Comments