• 15 थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलची सांगता
SHARE

प्रभादेवी - आशियाई चित्रपटांसाठी हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या थर्ड आय फिल्म फेस्टिव्हलचं यंदाचं 15 वं वर्ष. हा फेस्टिव्हल प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत रंगला. आशिया खंडातील विविध देशांच्या 24 लघुपटांमध्ये इराणी लघुपटाचाही समावेश होता. प्रभात चित्रमंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचा15 वा थर्ड आय पुरस्कार द डॉटर या इराणी लघुपटाला मिळाला. या महोत्सवाचं वेगळेपण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला सत्यजीत राय पुरस्काराने गौरवलं जातं. यंदाचा हा मान पटकावलाय पुण्याच्या सतिश जकातदार यांनी. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या