Advertisement

हिना पांचालचं मराठीमध्ये हॉट आयटम साँग!


हिना पांचालचं मराठीमध्ये हॉट आयटम साँग!
SHARES

सध्या मराठी चित्रपटात बॉलिवूडचे कलाकार थिरकताना पहायला मिळतात. आता या यादीत बॉलिवुड आणि टॉलिवुडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचालचं नावही सामील होणार आहे. ‘काय झालं कळंना’ या मराठी चित्रपटात हिना पांचालवर एक धमाकेदार आयटम साँग चित्रीत झालं आहे.



‘टकमक टकमक नजरा तुमच्या, होऊ दे आता बत्ती गुल’ असे बोल असलेल्या या हटके आयटम साँगचं चित्रीकरण नुकतंच झालं. या आयटम साँगची कोरिओग्राफी सुजीत कुमार यांनी केली आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं हे पहिलं आयटम साँग आहे. वलय मुलगुंद यांनी हे गीत लिहिलं आहे. 

हे आयटम साँग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम साँग ठेका धरायला लावेल असा विश्वास हिनाने व्यक्त केला. चित्रपटातील हिनाचा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की!



‘काय झालं कळंना’ या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची हलकी–फुलकी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांचं आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा