बिग बी विथ ट्रॅफिक पोलीस

मुंबई - मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी 28 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या सप्ताहाचं उद् घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं. या वेळी ट्रॅफिक पोलिसांचं काम कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चक्क पोलिसांच्या मुख्यालयामध्ये एन्ट्री केली. मुंबई ट्रॅफिक विभाग हा एवढा अद्ययावत झालेला पाहून बिग बी देखील चकीत झाले आहेत. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम (सीसीटीएनएस) या कार्यप्रणालीखाली संपूर्ण मुंबई सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे. त्यांनी या सगळ्याबाबत कुतूहलाने विचारपूसही केली. या वेळी बिग बीं यांनी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स देखील आपल्या फोनेवर डाउनलोड करून घेतल्या.

Loading Comments