‘परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ हा ग्लॅमरस दुनियेतील वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा कलाकार-तंत्रज्ञाांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

  • ‘परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
SHARE

एका लहानग्या परीची कथा सांगणारा ‘परी हूं मैं’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.




ग्लॅमरस दुनियेतील वास्तव

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ हा ग्लॅमरस दुनियेतील वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा कलाकार-तंत्रज्ञाांच्या उपस्थितीत संपन्न झाला. योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि श्रीमती शीला सिंह यांनी केली असून, दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचं आहे.


प्रसिद्धीनंतरच्या बदलांचा वेध

‘परी हूँ मैं’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये साजरी दिघे ऑडिशन देताना दिसते. तिच्या बोलक्या आणि निरागस अभिनयातून तिला एका मालिकेत परी नामक ऐश्वर्यसंपन कुटुंबातील लाडक्या मुलीची भूमिका साकारायची संधी मिळते. साजरीचे वडील माधव दिघे हे तिच्याबाबत संवेदनशील आणि अतिशय महत्वाकांक्षी असून शूटिंगच्या वेळी ते तिच्यासमवेत सावलीप्रमाणे राहतात. तर दुसरीकडे अभिनयाच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत आपल्या मुलीचं बालपण कुठे हरवू नये, याची तिच्या आईला काळजी आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर साजरी आणि तिच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांचा वेध ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात घेतल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं.


कथा इरावती कर्णिक यांची

चंदेरी दुनियेकडे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ध्येयपूर्तीची वाटचाल सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत. शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर या सिनेमातील गीतांना लाभला आहे.


७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित

‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१८’ मध्ये या चित्रपटाने उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि उत्कृष्ट मराठी अभिनेत्री असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही ‘परी हूँ मैं’ चित्रपट नावाजला गेला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही ‘परी’ ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



हेही वाचा -

भारतीय हाॅकीतल्या ‘गोल्ड’न क्षणांची आठवण

‘बोगदा’ चित्रपटातील ‘झुंबड...’ गाणं प्रदर्शित




संबंधित विषय