Advertisement

‘बोगदा’ चित्रपटातील ‘झुंबड...’ गाणं प्रदर्शित

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या सिनेमातील ‘झुंबड...’ हे गाणं सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘बोगदा’ चित्रपटातील ‘झुंबड...’ गाणं प्रदर्शित
SHARES
Advertisement

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या ‘बोगदा’ या एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमामुळे चर्चेत आहे. आगळ्यावेगळ्या शीर्षकामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या या सिनेमातील ‘झुंबड...’ हे नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.सिद्धार्थ महादेवनचा आवाज

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या सिनेमातील ‘झुंबड...’ हे गाणं सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेलं हे गाणं मंदार चोळकरने लिहिलं असून, सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने संगीतदिग्दर्शन केलं आहे. सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे.


पहिल्याच दिवशी चित्रीकरण 

‘झुंबड...’ या आवाज देताना सिद्धार्थ महादेवन इतका मोहून गेला होता की, या गाण्याच्या तालावर त्यानेच स्टुडीयोत ठेका धरला. इतकंच नव्हे तर, सेटवरील सर्व कलाकारांनादेखील या गाण्याने संमोहित केलं होतं. ‘झुंबड...’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस लागणार होते. परंतु जेव्हा त्याचं शुटींग सुरु झालं तेव्हा, या गाण्याच्या मोहात असलेल्या सेटवरील सर्व कलाकारांनी पहिल्याच दिवशी चित्रीकरण पूर्ण केलं


७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित

नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे हिच्या तालावर मृण्मयीनेदेखील ठेका धरत टीमला पुरेपूर साथ दिली. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाची पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनी केलं असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांबरोबर त्यांनी निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. मृण्मयीसोबत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.हेही वाचा-

प्रियंका, निक जोन्सचा मुंबईत 'रोका', संध्याकाळी एन्गेजमेंट पार्टी

राकेश बापटने धरली अध्यात्माची वाट
संबंधित विषय
Advertisement