Advertisement

प्रियंका, निक जोन्सचा मुंबईत 'रोका', संध्याकाळी एन्गेजमेंट पार्टी

प्रियंका आणि निक जोन्स यांच्यामध्ये शनिवारी सकाळी प्रियंकाच्या मुंबईतील निवासस्थानी 'रोका' हा विधी करण्यात आला. शिख धर्मियांमध्ये लग्नाच्या आधी हा विधी करण्यात येतो. या विधीचे काही फोटो दुपारी प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आले.

प्रियंका, निक जोन्सचा मुंबईत 'रोका', संध्याकाळी एन्गेजमेंट पार्टी
SHARES

अनेक चर्चांना पूर्णविराम देत प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोन्स यांचा शनिवारी सकाळी प्रियंकाच्या मुंबईतील निवासस्थानी 'रोका' हा विधी करण्यात आला. शिख धर्मियांमध्ये लग्नाच्या आधी हा विधी करण्यात येतो. या विधीचे काही फोटो दुपारी प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आले. यावेळी प्रियंकाची आई मधु चोप्रा, भाऊ सिद्धार्थ आणि निकचे आई-वडिल उपस्थित होते. प्रियंका आणि निक पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे साखपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियंकाचं जुहूतील घर सजवण्यात आलं असून तिथं पाहुण्यांची वर्दळही सुरू झाली आहे.

 

प्रियंकाने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये असताना निकसोबतच्या संबंधांचा खुलासा केला होता. त्याआधी वाढदिवसाचं निमित्त साधून निकने प्रियंकाला प्रपोज केलं होतं. शुक्रवारी रात्रीच निक आणि त्याचं कुटुंबिय साखपुड्यासाठी मुंबईत हजर झालं होतं.


विधी कशासाठी?

प्रियंका आणि निक यांचा काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये साखरपुडा झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र दोघांनीही यासंबंधी उघड मतप्रदर्शन केलं नाही. परंतु प्रथेनुसार सर्व विधी करण्यासाठी आणि कुटुंबाला या सोहळ्यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने प्रियंकाने आपल्या घरी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.



करणार खुलासा?

सोबतच प्रियंकाने मुंबईतील एका हाॅटेलमध्ये सायंकाळी मित्रमंडळींसाठी मोठ्या पार्टीचंही आयोजन केलं आहे. या पार्टीत कदाचित प्रियंका आपल्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्याचीही शक्यता आहे. या पार्टीला हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतच अमेरिकेतील सेलिब्रिटीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



कशी होती वेशभूषा?

'रोका' या विधीमध्ये प्रियंकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि निकने सफेद रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर निकच्या आई-वडिलांनीही पारंपरिक भारतीय वेशभूषा केली होती. या विधीत प्रियंकाची बहिण परिणीती चोप्रा देखील लखनऊ इथं सुरू असलेल्या शुटींगमधून वेळ काढून हजर झाली.



हेही वाचा-

प्रियंकाने निक जोनसशी केला साखरपुडा

‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा