Advertisement

राकेश बापटने धरली अध्यात्माची वाट

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावी?

राकेश बापटने धरली अध्यात्माची वाट
SHARES

काही कलाकार ठराविक वेळेनंतर आत्मसमाधानाच्या शोधात अध्यात्माकडं वळल्याचं आपण पाहिलं असेल, पण अभिनेता राकेश बापटने ऐन उमेदीच्या काळात अध्यात्माची वाट धरली आहे.


अध्यात्माची ओढ का ?

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावी? असा प्रश्न पडणं साहजिक आहे, पण यातही ट्विस्ट आहे. राकेश खऱ्या जीवनात नव्हे, तर चंदेरी दुनियेत अध्यात्माकडे वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या आगामी चित्रपटासाठी राकेश अध्यात्मिक बनला आहे.


वेगळी भूमिका 

१९९९ मध्ये ‘मि. इंडिया’चा रनर अप आणि ‘मि. इंटरकॉन्टीनेंटल’ स्पर्धेचा पहिला विजेता ठरलेल्या राकेशने ‘तुम बीन’, ‘दिल वील प्यार व्यार’ या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निमित्ताने त्याला पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात राकेशने साकारलेला अशोक हस्तमुद्रीकांमध्ये
 पारंगत आहे.


व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल

टीआयएफआरचा स्कॅालर असूनही तो अध्यात्माकडे का वळतो याचं उत्तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल. या सिनेमातील अशोकच्या भूमिकेबद्दल बोलताना राकेश सांगतो की, ‘आजवर मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ मधील व्यक्तिरेखाही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या शरद आणि कुसूम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल असा विश्वासही राकेशने व्यक्त केला आहे.


जॅान अब्राहमची मराठी निर्मिती 

‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून पटकथा व संवादलेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत.



हेही वाचा-

‘लव्ह सोनिया’ मराठी मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!

बाॅक्सिंग कोच बनण्यासाठी मिलिंदने वाढवलं वजन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा