Advertisement

‘लव्ह सोनिया’ मराठी मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!

‘स्लमडॉग मिलेनिअर’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव गाठिशी असलेल्या तबरेज नुरानी यांनी ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचं भारतातील मार्केटिंग आणि वितरणाचे सर्वाधिकार ‘समराज टॉकीज’ला मिळाले असून, या क्षेत्रातील पदार्पणातच ‘समराज टॉकीज’ने आंतरारष्ट्रीय सिनेमाच्या जगतात प्रवेश केला आहे.

‘लव्ह सोनिया’ मराठी मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!
SHARES

दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबापासून ते मुंबई, बँकॉक आणि अमेरिकेतल्या लास वेगासपर्यंतच्या मोहमयी दुनियेपर्यंत व्यापून राहिलेला भीषण प्रश्न आहे वेश्या व्यवसायासाठी होणारी मानवी तस्करी. दिग्दर्शक तबरेज नुरानी यांनी ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाच्या माध्यमातून हाच मुद्दा प्रथमच जागतिक पातळीवरील सिनेमात मांडला आहे. हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून १४ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


कुणाचं दिग्दर्शन?

‘स्लमडॉग मिलेनिअर’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव गाठिशी असलेल्या तबरेज नुरानी यांनी ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचं भारतातील मार्केटिंग आणि वितरणाचे सर्वाधिकार ‘समराज टॉकीज’ला मिळाले असून, या क्षेत्रातील पदार्पणातच ‘समराज टॉकीज’ने आंतरारष्ट्रीय सिनेमाच्या जगतात प्रवेश केला आहे.


वास्तव काय?

मागील १७ महिन्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातील तब्बल ३२ हजार ७६२ मुली बेपत्ता झाल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीद्वारे स्पष्ट झालं आहे. बेपत्ता होणाऱ्या महिलांची सरासरी काढली तर महिन्याला जवळपास २०००, तर दिवसाला सुमारे ६४ महिला-मुली या आपल्या राज्यातून बेपत्ता होत आहेत. अनेकदा लहान बालकंही पळवली जातात किंवा गरीबीमुळे विकली जातात. ‘लव्ह सोनिया’ हा अशा प्रकारच्या वास्तवाला थेट भिडणारा आणि त्यामागचं सत्य उलगडून सांगणारा सिनेमा असल्याचं सांगितलं जात आहे.


कुणाच्या भूमिका?

पहिल्या टप्प्यात ‘लव्ह सोनिया’ हा सिनेमा देशभरातील ३५०हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवण्याची योजना आखण्यात आली आहे. या सिनेमात मृणाल ठाकूर, फ्रीदा पिंटो, डेमी मूर, मार्क डप्लास, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चड्डा, रिया सिसोदिया, अनुपम खेर, आदिल हुसैन, सई ताम्हणकर आणि सनी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

तबरेज नुरानी यांचे ‘तमाशा टॉकीज’ आणि डेव्हिड वूमार्क (‘लाइफ ऑफ पाय’चे निर्माते) यांचे ‘वूमार्क प्रोडक्शन’ यांची निर्मिती असलेल्या ‘लव्ह सोनिया’चे सहनिर्माते आहे, शालिनी ठाकरे यांचं सिनेमंत्र प्रोडक्शन. या सिनेमाबाबत शालिनी ठाकरे म्हणाल्या की, ‘लव्ह सोनिया’ हा जागतिक पातळीवरील मुद्दा मांडणारा आपल्या मातीतला सिनेमा आहे. त्यात हाताळण्यात आलेला मानवी तस्करीचा विषय अवघ्या जगाला व्यापून आहे. हा वेगळ्या वाटेचा आणि आशयघन सिनेमा भारतात सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावा यासाठी त्याच्या मार्केटिंगची तसंच वितरणाची जबाबदारी समराज टॉकीजने स्वीकारल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

अभिनेता विकी कौशल बनला गायक

श्रीदेवींच्या १८ फूट उंच चित्राचं अनावरण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा