Advertisement

अभिनेता विकी कौशल बनला गायक


अभिनेता विकी कौशल बनला गायक
SHARES
Advertisement

अभिनेता विकी कौशल हे नाव आता सर्वांच्याच परिचयाचं झालं आहे. एका मागोमाग एक धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या विकीचं ‘संजू’ सिनेमातील कामाचं सर्वांनीच खूप कौतुक केलं होतं. हाच विकी आता गायक बनला आहे.


आगामी सिनेमात सिंगर

‘लव्ह शव्ह ते चिकन खुराना’, ‘बॅाम्बे वेल्वेट’, ‘मसान’, ‘राझी’ या सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या कारकिर्दीचा प्रवास आता ‘संजू’पर्यंत येऊन पोहोचला आहे. या सिनेमात पुन्हा प्रेक्षकांना मोहिनी घालण्यात यशस्वी झाल्याने विकी पुढे कोणत्या सिनेमात दिसणार याचं कुतूहल साऱ्यांनाच होतं. असिस्टंट दिग्दर्शनापासून अभिनेत्यापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करणाऱ्या विकीने ‘मनमर्जिया’ या आगामी सिनेमात अभिनयासोबतच गाणंही गायलं आहे.


म्युझिकल लव्ह स्टोरी

‘देव डी’ नंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा म्युझिकल लव्ह स्टोरीकडे वळले आहेत. या लव्ह स्टोरीला संगीतकार अमित त्रिवेदी यांचं संगीत लाभलं आहे. या सिनेमातील ‘एफ फाॅर फ्यार...’ हे गाणं विकीच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


गाणं एन्जाॅय केलं

याबाबत अमित त्रिवेदी म्हणाले की, या सिनेमात विकीने डीजेची भूमिका साकारली आहे. या गाण्यातील काही ओळी विकीने गायल्या आहेत. विकीने जेव्हा हे गाणं ऐकलं, तेव्हा स्वत: चा आवाज ऐकून तो देखील आश्चर्यचकित झाला. एकूणच त्याने गाणं गाण्याची प्रोसेस एन्जॅाय केल्याचं त्रिवेदी यांचं म्हणणं आहे.

विकीलाही या गाण्याचं प्रचंड कुतूहल होतं. हे गाणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं विकी मानतो. अनुराग कश्यपसारख्या मातब्बर दिग्दर्शकासोबत काम करताना नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळत असल्याचंही तो मान्य करतो.हेही वाचा-

श्रीदेवींच्या १८ फूट उंच चित्राचं अनावरण

६ महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी ‘गोल्ड’न मोमेंट!संबंधित विषय
Advertisement