• 'बाहुबली 2'चा ट्रेलर लाँच
SHARE

अंधेरी - कटप्पाने बाहुबलीला मारले तरी का? हा प्रश्न बाहुबली या चित्रपटाचा पहिला भाग पाहून सर्वांनाच पडला. आता या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. 'बाहुबली द कनक्ल्युजन' या चित्रपटाद्वारे कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी अंधेरी पश्चिम इथल्या सिनेपोल चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. पण या वेळी विशेष म्हणजे एवढी जबरदस्त कामगिरी करूनही या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. त्यामागचं कारण म्हणजे हा ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच फेसबुकवर लीक झाला. मूळ नियोजनानुसार गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या चित्रपटाचा ट्रेलर एका पत्रकार परिषदेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, गुरुवारी सकाळीच या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीचा ट्रेलर फेसबुकवर व्हायरल झाला. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना जबरदस्तीने सर्व भाषांमधील या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करावे लागले.

'बाहुबली' भाग 2 हा सिक्वेल सिनेमा नसून बाहुबली एकचाच पुढचा भाग आहे. 'बाहुबली द कनक्लुजन' प्रदर्शित होण्याआधी बाहुबली भाग1 ज्यांनी पाहिला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा प्रदर्शित केला जाण्याची शक्यता राजामौली यांनी व्यक्त केली. ट्रेलर प्रदर्शनासाठी चित्रपटातील कलाकार प्रभास आणि राणा डग्गुपती उपस्थित होते. तसेच दिग्दर्शक राजामौली, करणजोहर देखील उपस्थित होते.


'बाहुबली 2'चा ट्रेलर सुसाट!

'बाहुबली द कनक्लुजन' प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः उचलून धरलं आहे. 'यु ट्यूब'वर या चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या 10 तासांमध्ये तब्बल 1 कोटी 22 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या. प्रभास, राणा डग्गूपती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्ण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या