ईदला तो येतोय 'ट्युबलाईट' घेऊन

 Mumbai
ईदला तो येतोय 'ट्युबलाईट' घेऊन

सलमानच्या 'ट्युबलाईट' सिनेमाचे पहिले पोस्टर आणि प्रोमो लाँच झाला आहे. दिग्दर्शक कबीर खानने सलमानच्या आगामी 'ट्युबलाइट' चित्रपटाचा प्रोमो लाँच केला आहे. कबीरने त्याच्या ट्विटमध्ये 'ईद मनाओ ट्युबलाईट के साथ' असे ट्विट केले आहे.

'ट्युबलाईट'चा प्रोमो चांगलाच धुमाकूळ घालत आहे. युट्युबवर आत्तापर्यंत प्रोमोला ३ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या प्रोमोमध्ये बऱ्याच लहान मुलांचा आवाज येत आहे. १४ सेकंदांच्या या प्रोमोमध्ये ट्युबलाईट ब्लिंक होते तसा इफेक्ट देण्यात आला आहे.

प्रोमोसोबत सलमान खानने 'ट्युबलाईट' चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये सलमान पाठमोरा उभा आहे. तसेच पोस्टरवर 'क्या तुम्हे यकीन है' असे लिहले आहे. 'तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? मग माझ्या पाठिशी रहा' असे ट्विटही सलमानने केले आहे.

'ट्युबलाईट' चित्रपट ईद ला प्रदर्शित होणार आहे. ईद येते तेव्हा सलमानचा चित्रपट येतो. सलमानचा चित्रपट येतो तेव्हा ती सर्वांसाठी ईद असते. 'ट्युबलाईट' चित्रपटात माटिन रे तगू या बालकलाकारासोबत सलमान खान झळकणार आहे. तसेच यात हर्षाली मल्होत्रा ही बालकलाकारही असणार आहे. यासोबतच नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत.

Loading Comments