Advertisement

‘लव्ह मॅरेज’ सोडा ‘अरेंज मॅरेज’ बघा!

‘तुझं माझं अॅरेज मॅरेज’ या चित्रपटाद्वारे पारंपारिक विवाहपद्धतीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिनेश विजय शिरोडे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

‘लव्ह मॅरेज’ सोडा ‘अरेंज मॅरेज’ बघा!
SHARES

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, लग्न, प्रेमविवाह या विषयांवर आधारित बरेच चित्रपट येत आहेत. या विषयांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रपटांमध्ये दाखवलं जात आहे. या चित्रपटांच्या गर्दीत ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ या चित्रपटाद्वारे पारंपारिक विवाहपद्धतीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिनेश विजय शिरोडे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.


सिनेमाची कथा?

प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्यावेळी होणारी गडबड हे नाट्यमय असतं. हा सगळा प्रकार मनोरंजक पद्धतीने पहायला मिळणार आहे.


वेगळ्या विषयावर सिनेमा

षष्ठीज फिल्म अँड एंटरटेन्मेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'हलाल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसंच 'लेथ जोशी', 'परफ्युम' या चित्रपटांचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. नेहमीच वेगळा विषय त्यांनी चित्रपटातून मांडला असल्याने ‘तुझं माझं अॅरेज मॅरेज’ या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


धमाल आणि मनोरंजन

अरेंज मॅरेजचा विषय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा-गीतलेखन मयूर परदेशी, छायांकन सुनील बोरकर यांचं आहे. प्रतिक-प्रथमेश यांचं संगीत दिग्दर्शन असून, गायक अवधूत गुप्तेच्या आवाजात गीत रेकॉर्ड करण्यात आलं आहे, तर कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांचं आहे.


हेही वाचा -

अवधूत-आदर्शचा ‘वक्रतुंड महाकाय’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा