देसी गर्ल प्रियंका चोप्रा व्हेंटिलेटर या सिनेमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे. तिच्या चाहत्यांना या सिनेमाची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता ब-याच दिवसांपासून लागली होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा खुद्द प्रियंकानेच पूर्ण केलीय. गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रियंकाने व्हेंटिलेटर सिनेमातील दोन गाणी तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलीत.
‘या रे या, सा रे या, गजाननाला आळवूया…’ हे गीत प्रियंकाने गणरायाच्या चरणी समर्पित केलेय. हे गीत आपण गणेशोत्सवादरम्यान वडील, काका यांच्या तोंडून ऐकल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी सांगितले. तसेच या गीतामुळे श्रीवर्धनमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव नजरेसमोर उभा राहिल्याची भावना व्यक्त केली. या गीताचा मुखडा राजेश मापुसकर यांचे काका शांताराम मापुसकर यांनी शब्दबद्ध केलाय. तर संगीत रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांनी दिलेय.