Advertisement

'व्हेंटिलेटर'ची टीम कोरम मॉलमध्ये


'व्हेंटिलेटर'ची टीम कोरम मॉलमध्ये
SHARES

मुलुंड - ठाणे तसंच मुलुंडकरांचे आभार मानण्यासाठी व्हेंटिलेटर चित्रपटाची टीम रविवारी रात्री कोरम मॉलमध्ये दाखल झाली. चित्रपटाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी चित्रपट अजून पाहिलेला नाही, त्यांना तो पाहण्याचं आवाहन करण्यासाठी हा प्रमोशन सोहळा. अभिनेता जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर आणि व्हेंटिलेटर चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर या वेळी उपस्थित होते. मी नशिबवान आहे कारण आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं, अशी भावना अभिनेता जितेंद्र जोशीनं या वेळी व्यक्त केली. या वेळी चित्रपट रसिकांची चांगलीच गर्दी जमली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा