Advertisement

पडद्यावरचे 'बाबा चमत्कार' अभिनेते राघवेंद्र काडकोळ यांचं निधन

‘बाबा चमत्कार’ हे पात्र साकारुन प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन झालं आहे.

पडद्यावरचे 'बाबा चमत्कार' अभिनेते राघवेंद्र काडकोळ यांचं निधन
SHARES

महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ हे पात्र साकारुन प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कडकोळ हे अभिनेता आणि लेखक होते. मराठी चित्रपट, नाटक यांसह दूरचित्रवाहिनी मालिकांतून त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

कृष्णधवल चित्रपटातून राघवेंद्र कडकोळ यांनी आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. कडकोळ हे प्रामुख्यानं ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारल्यानं ते जास्त प्रसिद्धी झोतात आले होते. राघवेंद्र कडकोळ यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही प्रचंड गाजली.

‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचं पुस्तकही लिहीलं आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा