ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप कालवश

 Pali Hill
ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप कालवश

मुंबई - सुरेल भक्तिगीतांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. होनप यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

शनिवारी एका संगीत कार्यक्रमाला उपस्थित असताना होनप यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तिमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिले होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली 'निघालो घेऊन दत्ताची पालखी.' 'स्वामी समर्था माझी आई.' अशी अनेक भक्तिगीते प्रसिद्ध आहेत. त्यांनी 96 चित्रपटांना संगीत दिले होते. विश्वास हा त्यांनी संगीतबद्ध केलेला शेवटचा चित्रपट ठरला.  आकस्मित निधनामुळे त्यांचे १०० चित्रपटांना संगीत देण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

Loading Comments