विद्याची 'माय स्टोरी' !

  Andheri west
  विद्याची 'माय स्टोरी' !
  मुंबई  -  

  बॉलिवूडची उलाला गर्ल विद्या बालन दुसऱ्या बायोपिक सिनेमाच्या तयारीला लागली आहे. तिचा आगामी मल्याळी सिनेमा 'आमी'मध्ये ती लेखिका कमला दास ऊर्फ कमला सुरैय्या यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी ती लेखिकेची आत्मकथा 'माय स्टोरी' हे पुस्तक वाचत आहे. नुकतेच तिने ते पुस्तक वाचत असल्याचा फोटो तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तसंच या फोटो बरोबर 'मी तुम्हाला कमला दास यांची कहाणी सांगण्याची तयारी करत आहे, असे ट्विट केले आहे. या रोलसाठी ती आता मल्याळी भाषेचे धडेही गिरवत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.