SHARE

बोरीवली - दुकानात आणि कुठेही गेल्यावर अगोदर पैसे द्या आणि नंतर वस्तू घ्या असे फलक लावलेले पाहायला मिळतात. मात्र मोदी सरकारने 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा अचानक बंद केल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. परंतु अमर फोटो स्टुडिओ निर्मिता सुनील बर्वे यांच्या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे येथे आज नाटक बघा, उद्या पैसे द्या अश्याप्रकारे जाहिरात दिली आहे. या अगोदर प्रेक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. तर आपण देखील प्रेक्षंकावर विश्वास ठेवला पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या