‘वेडींग सेरेमनी’चे म्यूझिक लाँच


SHARE

जुहू - 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘वेडींग सेरेमनी’ या हिंदी सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. जुहुमध्ये हा शानदार सोहळा पार पडला. अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. या चित्रपटात नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका आहे. ‘वेडींग सेरेमनी’ सिनेमा एक आगळावेगळा मनोरंजन करणारा सिनेमा असून, हा चित्रपट नक्की सिनेमागृहात जाऊन बघा असं आवाहन 'नाना'ने केलं. देशासाठी बॉर्डरवर लढणाऱ्या हुतात्मांच्या कुटुंबासोबत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सर्वजण एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रियाही नाना पाटेकर यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या