Advertisement

विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन


विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
SHARES

गेली ४३ वर्ष रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी व चतुरस्त्र अभिनेते विजय कदम मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर येणार आहेत. मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारुपाला आले. मनाने युवा असलेले विजय कदम झी युवा या वाहिनीवरील 'जिंदगी नॉट आउट' या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावरील नवीन इनिंग खेळणार आहेत.



'जिंदगी नॉट आउट' या मालिकेत २१ वर्षांच्या सचिन देसाई या मुलाचं क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेलं त्याचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनच्या या स्वप्नात येणाऱ्या अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसं तोंड देतं? हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. मुख्यतः क्रिकेट हा खेळ ज्यांच्यासाठी धर्म आहे अशी तरुण मंडळी ही मालिका आवडीने पाहात आहेत. 

मालिकेत सर्वोतोपरी क्रिकेटसाठी आयुष्य देणाऱ्या सचिनला एका योग्य क्रिकेट कोचची गरज असते. पण पैसे नसल्या कारणाने त्याला योग्य संधी मिळत नाही. याच वेळी त्याची क्रिकेट मधील द्रोणाचार्य असलेल्या विजय कदम यांच्याशी भेट होते. आता विजय कदम सचिनला त्याच्या करिअरसाठी कशी मदत करतात? हे पाहण्यासारखे असेल.

 


आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक क्रिकेट वेड्या मुलाच्या हृदयाशी जाऊन भिडणारी अशी ही 'जिंदगी नॉट आउट' मालिकेची कथा आहे. विजय कदम या मालिकेत सचिन देसाईचे क्रिकेट मधील द्रोणाचार्य म्हणजेच त्याचे कोच म्हणून येत आहेत. नेहमीच प्रेक्षकांना हसवणारे विजय कदम ही एक वेगळी भूमिका कशी सादर करतात? हे नक्कीच पाहण्यासारखे असेल.



हेही वाचा

‘छंद प्रितीचा’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा