Advertisement

‘छंद प्रितीचा’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च


‘छंद प्रितीचा’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च
SHARES

'छंद प्रितीचा' या आगामी मराठी चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत जाधव, लेखक-दिग्दर्शक एन. रेळेकर, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री नृत्यांगना काळे, अभिनेते हर्ष कुलकर्णी, विकास समुद्रे, संगीतकार प्रविण कुंवर यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्याची सुरुवात विकास समुद्रे आणि जयवंत भालेकर यांच्या दमदार स्कीटने झाली. यानंतर चित्रपटाचं पहिलं-वहिलं 'आलं आभाळ भरून' हे रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं. या सोहळ्यात बेला शेंडे आणि वैशाली सामंत या दोन्ही नामवंत गायिकांच्या सुरेल स्वरातील फटकेबाज सवाल-जवाबांनी रंगत आणली. त्यानंतर सुवर्णा काळेच्या मोहक अदांनी रंगलेल्या 'नाही जायचं घरी, वाजो पहाटेचे पाच...' या ठसकेबाज लावणीने मनमुराद डोलायला लावले. या सिनेमाच्या निमित्ताने 'निस्ती दारावर टिचकी मारा...'या ठसकेबाज लावणीचाही आस्वाद घेता येणार आहे.



'छंद प्रितीचा' या चित्रपटात एकूण आठ गाण्यांचा समावेश असून गीतकार एन. रेळेकर यांच्या लेखणीतून ती अवतरलेली आहेत. आजचा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक जावेद अली तसेच बेला शेंडे, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, केतकी माटेगावकर यांसारख्या एकापेक्षा एक मातब्बर अशा गायक-गायिकांच्या मधुर गीतांना संगीतकार प्रविण कुंवर यांनी संगीतबद्ध केलेले आहे. येत्या 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा