ऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'

 Pali Hill
ऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'
ऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'
ऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - अभिनेता ऋषी कपूरने 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या आत्मचरित्रात आपल्या जीवनातील अनेक मनोरंजक पैलूंवर भाष्य केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमसोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे. 1988 मध्ये दुबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असताना ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली. या वेळी दोघांमध्ये तब्बल चार तास चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यात दिली आहे.

ऋषी कपूर सांगतात की, ‘ही १९८८ सालातील गोष्ट आहे. माझा जवळचा मित्र बिट्टू आनंद याच्यासोबत मी आशा भोसले आणि आरडी बर्मन यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला आलो होतो. त्यावेळी दाऊदने मला चहा प्यायचे निमंत्रण दिले. मला यात चुकीच वाटलं नाही. त्यामुळे मी ते आमंत्रण स्वीकारलं. मला आणि बिट्टूला एका चमकत्या रोल्स रॉयस गाडीमधून हॉटेलवरून नेण्यात आले. आमची गाडी उलटसुलट जात असल्याचे मला जाताना लक्षात आले. त्यामुळे मी त्याच्या घराचं निश्चित स्थान सांगू शकत नाही. त्यानंतर आमची भेट झाली. दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन कपड्यांमध्ये माझ्यासमोर आला. त्याने आमचे स्वागत केले. आमची क्षमा मागण्याच्या अंदाजात तो म्हणाला, मी मद्यपान करत नसल्यामुळे तुम्हाला चहासाठी बोलावले. त्यानंतर आमचे चहापान जवळपास चार तास चालले. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर माझ्याशी चर्चा केली.’

Loading Comments