Advertisement

‘बिग बॅास’मध्ये कोण बनणार नवा कॅप्टन?

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात गुरुवारी रंगलेल्या डाबर रेड पेस्ट प्रस्तुत ‘हेल्थी स्माईल’ या स्पर्धेत डाबर रेड पेस्ट ही टीम म्हणजेच मेघा, पुष्कर आणि आस्ताद विजयी ठरले. या तिघांमध्ये आज कॅप्टनसीचं कार्य रंगणार आहे. तेव्हा ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘बिग बॅास’मध्ये कोण बनणार नवा कॅप्टन?
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये गुरुवारी सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत ‘हेल्थी स्माईल’ या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सदस्यांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये डाबर रेड पेस्ट ही टीम म्हणजेच मेघा, पुष्कर आणि आस्ताद विजयी ठरले. या तिघांमध्ये आज कॅप्टनसीचं कार्य रंगणार आहे. तेव्हा ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

आजच्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये कोणाला घराचा कॅप्टन करायचा, यावरून आस्ताद, रेशम, स्मितामध्ये बरीच चर्चा होणार आहे. मात्र जो विजयाचा झेंडा रोवणार, तोच कॅप्टन होणार. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकवण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतिकात्मक वापर होत असे. कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्त्वाची भूमिका असेल.

 या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे आहेत. या तिघांमध्ये सरस ठरत कोण आपल्या विजयाचा ध्वज फडकावतो हे पाहण्यासाठी ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे’ हे कॅप्टनसीचं कार्य ‘बिग बॉस’ सदस्यांवर सोपवणार आहेत. या टास्कमध्ये नंदकिशोर, शर्मिष्ठा, आस्ताद आणि मेघामध्ये बरेच वाद होताना पाहायला मिळतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा