Advertisement

श्वेता तिवारीचं दुसरं लग्नही मोडणार?


श्वेता तिवारीचं दुसरं लग्नही मोडणार?
SHARES

सेलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत राहतातच. मग ती चांगली गोष्ट असो वा वाईट. त्यांच्याबरोबर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होतच असते. सध्या टीव्ही कलाकार श्वेता तिवारी चर्चेत आहे.

श्वेता तिवारीचं दुसरं लग्नही मोडणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं समजतंय. हे दोघे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहेत. दोघांमध्ये एकमेकांच्या करिअरबाबत वाद होत आहेत.



मात्र 'आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाहीत. श्वेताच्या यशामुळे मी कधीच असुरक्षित नव्हतो. आम्ही दोघे आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून आनंदात आहोत,' असं अभिनवने स्पष्ट केलंय.

श्वेता तिवारीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी श्वेताने राजा चौधरीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर 2007 मध्ये तिने घटस्फोट घेतला होता. श्वेताला एक मुलगीही आहे. त्यानंतर तिने २०१३मध्ये अभिनवशी लग्न केलं. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र अभिनव आणि श्वेताच्या या घटस्फोटाच्या बातमीमुळे आता श्वेताचं दुसरं लग्नही मोडणार की काय? अशी चर्चा रंगत आहे.



हेही वाचा

कल्की कोचलीनच्या 'रिबन'चा ट्रेलर लाँच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा