Advertisement

अभिनेत्री यामी गौतम 'या' दिग्दर्शकासोबत अडकली विवाह बंधनात

अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अभिनेत्री यामी गौतम 'या' दिग्दर्शकासोबत अडकली विवाह बंधनात
SHARES

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) विवाहबद्ध झाली आहे. अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

आदित्य धरसोबत (Aditya Dhar) यामी गौतमनं लग्न केलं आहे. यामी गौतम अभिनित ‘उरी’ (Uri या चित्रपटाचा आदित्य धर दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशल (Vikki Kaushal) देखील मुख्य भूमिकेत दिसला होता.

आपल्या पोस्टची सुरूवात यामीनं पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कवितानं केली आहे. तिनं लिहिलं आहे की, तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले. आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादानं, आज आम्ही लग्न केलं आहे. हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्यामुळे आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.

‘उरी’ या चित्रपटापासून यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

बर्‍याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी कोरोना काळात लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील यापूर्वी जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. या वधू वेशामध्ये यामी खूपच सुंदर दिसत आहे.

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम सध्या ३२ वर्षांची आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला. यामी गौतमनं ‘उरी’ सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमातही दमदार भूमिका साकारल्या आहेत.

यामी गौतम ‘फेअर अँड लव्हली’ (Fair And Lovely)च्या जाहिरातीतून प्रकाशझोतात आली. त्यानंतर मग तिला २००८-२००९ मध्ये ‘चाँद के पार चलो’ (Chand ke paar chalo) ही टीव्ही मालिका मिळाली. अनेक छोट्या मोठ्या सिरीयल करताना, तिला तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये भूमिका मिळाल्या.

यामीनं 2012 मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ (Vicky Donner) या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला.

यानंतर मग तिनं २०१५ मध्ये आलेल्या बदलापूर सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर मग तिची काबील सिनेमातील अंध महिलेची भूमिकाही गाजली.हृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात

हिरोपंती टाळा! टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी विरोधात गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा