Advertisement

हृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात

अभिनेता हृतिक रोशननं पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

हृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात
SHARES

अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan)नं पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (Cine And TV Artistes Association) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हृतिकनं असोसिएशनला २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. दारिद्र्य रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या ५ हजार सदस्यांना होणार आहे.

हृतिक रोशनचे आभार मानताना सिंटा (CINTAA)चे महासचिव, अमित बहल म्हणाले की, "हृतिक रोशननं मागच्या लॉकडाउन(Lockdown)च्या वेळेस देखील आमची मदत केली होती. यावेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या ५००० सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे."

अभिनेता या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. कोविड -19 च्या पहिल्या लाटेत देखील, हृतिकनं सिंटा (CINTAA) साठी २५ लाखाची आर्थिक मदत केली होती. ज्यातून ४ हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्सपासून फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान देण्याबरोबरच कोविड -19 रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि कंसेंट्रेटर्सपर्यंत सर्व प्रकारे हृतिक अनेक गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत आहे.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात वेधाच्या रूपात दिसणारा हृतिक रोशन चार वेगळ्या भूमिकेत देखील पाहायला मिळणार आहे. त्याची पात्रं काशीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

यासाठी हृतिकनं आपला गेटअप आणि कॉस्ट्यूमविषयी काही खास माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर हृतिक आपल्या पात्रासाठी खास काशीची भाषा देखील शिकणार आहे. भाषा आणि टोन शिकवण्यासाठी एक प्रशिक्षकही नेमण्यात आला आहे.

चित्रपटात हृतिकच्या लूकवर बरेच प्रयोग केले जात आहेत. त्याचे वेधाचे पात्र तरुण वयापासून ते गुन्हेगारी जगतात अधिपत्य गाजवण्यापर्यंतचे वेगवेगळ्या रूपात दाखवले जाणार आहे. हृतिक स्वत:ही चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण 'धूम 2’ नंतर तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम वेधाचे ४० टक्के चित्रीकरण मुंबईत होणार आहे. तर उर्वरित ६० टक्के चित्रीकरण हे लखनऊ, बनारस आणि यूपीत होईल.

कोविडची दुसरी लाट आली नसती तर एप्रिल महिन्यातच हा चित्रपट फ्लोअरवर आला असता. निर्माते याचे चित्रीकरण काही लाइव्ह लोकेशनवर घेऊ इच्छित आहेत. यासाठी त्यांनी मुंबई आणि काशीमध्ये काही ठिकाणाची पाहणी केली आहे.हेही वाचा

हिरोपंती टाळा! टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी विरोधात गुन्हा दाखल

विद्या बालनच्या शेरणी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा