Advertisement

झहिर-सागरिकाच्या लव्ह स्टोरीचा खास व्हिडिओ


झहिर-सागरिकाच्या लव्ह स्टोरीचा खास व्हिडिओ
SHARES

बॉलिवूड आणि क्रिकट हे फार जुनं समिकरण आहे. अनेक बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. अनेकांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेम आणि नंतर लग्नात झालं आहे. 


 

यातली दोन ताजी उदाहरणं म्हणजे विराट कोहली - अनुष्का शर्मा आणि झहीर खान - सागरिका घाटगे. यातील सागरिका आणि झहीर खानची प्रेमकहाणी खूप इंट्रेस्टिंग आहे.


23.11.2017 ❤️

A post shared by  Sagarika (@sagarikaghatge) on

 

काय आहे या व्हिडिओत?

एका व्हिडिओच्या माध्यमातून या दोघांनी आपली लव्ह स्टोरी आणि लग्नानंतरची स्टोरी त्यांच्या चाहत्यांसमोर आणली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एकमेकांबद्दलचे अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. या दोघांची ओळख कशी झाली, प्रेमात कधी पडले, लग्न करण्याचा निर्णय कधी घेतला, हे या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे.

❤️ wearing @anjumodi .

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

कशी झाली दोघांची ओळख?

सागरिका आणि झहिरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यांच्या या प्रेमकरणाची खबर मात्र त्यांनी कोणालाच लागू दिली नाही. त्याचबरोबर सागरिकाने आपल्या लग्नानंतर आयुष्य कसं बदललं, झहिर आणि वडिलांची पहिली भेट याविषयी अनेक किस्से सांगत अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओतून झहिर आणि सागरिकाच्या प्रेमाचा रंजक प्रवास तुम्हाला बघता येईल.


संबंधित विषय
Advertisement