पर्यावरण संवर्धनासाठी आरेमध्ये लावली 300 झाडे

 Malad
पर्यावरण संवर्धनासाठी आरेमध्ये लावली 300 झाडे
Malad, Mumbai  -  

एकीकडे मेट्रो प्रकल्पामुळे आरेमध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असताना दुसरीकडे मात्र आरे कॉलनीच्या सेक्टर 28 मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मालाड पूर्व येथील अप्पर गोविंदनगरमधील रहिवाशांनी एएलएमच्या माध्यमातून 300 झाडे लावत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.अप्पर गोविंदनगर एएलएम, सेव्ह आरे फाऊंडेशन एन्व्हायर्नमेंट, हेल्पिंग हँड आणि काही शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने आरेमध्ये ही झाडे लावली जाणार आहेत. शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी या परिसरात 1998 साली मनपाद्वारे एएलएमची स्थापना करण्यात आली होती.या एएलएमच्या माध्यमातून पर्यावरणासोबतच इतर महत्त्वाच्या समस्या देखील सोडवण्यात येऊ लागल्या. विशेष म्हणजे शहरातील पर्यावरणाचा समतोल राखावा या उद्देशाने आतापर्यंत शहरात 3000 झाडे लावण्यात आली आहेत. तसेच अजून 3000 झाडे लावणार असल्याची माहिती अप्पर गोविंदनगर एएलएमचे अध्यक्ष सुभाष राणे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

'आज मुंबईमध्ये विकामकामांना वेग आला आहे. ज्यामुळे पर्यावरणालाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनीही झाडे लावावीत आणि शहर प्रदुषणापासून वाचवावे', असे आवाहन सुभाष राणे यांनी यावेळी केले आहे.

Loading Comments