SHARE

मुंबई - 'बर्ड मॅन ऑफ इंडिया' डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला साजरी करण्यासाठी बीएनएचएसने गेल्या वर्षापासून 'सलीम अली बर्ड काऊंट' ही देशव्यापी पक्षी गणना सुरू केली आहे. या वर्षी ही पक्षीगणना 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. पक्षी प्रेमींनी यात सहभागी होण्याकरता एक तास पक्षीनिरीक्षण करावे. निरीक्षण केलेल्या पक्ष्यांची नावं आणि संख्या www.bnhs.org या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या यादीत भरून ती यादी सहाय्यक संशोधक नंदकिशोर दुधे यांना Arial TUR>n.dudhe@bnhs.org/Arial TUR> या ई-पत्त्यावर पाठवावी. पक्षीनिरीक्षकांकडून पक्षीनिरीक्षणाची प्रत्येक ठिकाणाची वेगळी यादी आवश्यक असल्याचं बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या