येत्या ३६ तासांमध्ये मुंबईत पावसाची शक्यता

येत्या ३६ तासात मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

SHARE

सोमवारी रात्री मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं येत्या ३६ तासात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  हवामान खात्यानं मुंबईत सोमवारी हलका पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र संध्याकाळपर्यंत पावसाची चिन्हं दिसत नव्हती. पण संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. अखेर रात्री १० च्या सुमारास पावसानं चांगलाच जोर धरला

मंगळवार ते शुक्रवार मुंबई, ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे येत्या २४ तासांमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होईल आणि त्यानंतरच्या २४ तासांमध्ये त्याची तीव्रता वाढेल. कुलाबा इथं रात्री ८.३०पर्यंत ०.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. तर सांताक्रूझ इथं अजिबात पाऊस नव्हता. सोमवारी सांताक्रूझचं कमाल तापमान ३३., तर कुलाब्याचं कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस होतं. मात्र आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास होती.

राज्यात शनिवारपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवारी पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत पावसानं विश्रांती घेतली असली तरी रविवारी पडलेल्या पावसामुळे अनेक शाळांच्या मैदानात चिखल साचला होता. त्यामुळे चिखलातून वाट काढत मतदारांना मतदान करण्यास जावं लागत होतं.  

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या