Advertisement

मुंबईत १ जूनला पाऊस?


मुंबईत १ जूनला पाऊस?
SHARES

मुंबईतील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उकाडा वाढल्यानं मुंबईकरांना पावसाची आतुरता लागली आहे. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत १ अथवा २ जूनच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील बदलापूर आणि पुणे येथील अजुबाजूच्या परिसरात वादळी वारे आणि पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मुंबईत अजूनही पावसाचं वातावरण नासून, उकाडा प्रचंड वाढला आहे. त्याचप्रमाणं, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईकर घरीच आहेत. त्यामुळं आणखी त्रासात भर आहे.

याआधी आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार, जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहेत. तसंच, केरळमध्ये सुरूवात झाल्यावरच मुंबईतील मॉन्सूनच्या सुरूवातीच्या अचूक तारखेचा अंदाज घेता येणार आहे.

सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. १ जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. 

 

Read this story in English
संबंधित विषय