इच्छा असल्यास कचऱ्याचंही बनू शकतं सोनं!

Mulund
इच्छा असल्यास कचऱ्याचंही बनू शकतं सोनं!
इच्छा असल्यास कचऱ्याचंही बनू शकतं सोनं!
इच्छा असल्यास कचऱ्याचंही बनू शकतं सोनं!
See all
मुंबई  -  

मुंबईत सध्या डम्पिंग ग्राऊंडची समस्या बिकट होत चालली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग साचलेला असतो. मुंबईत सध्या कचऱ्याचा प्रश्न दिवासेंदिवस कठीण होत चालला आहे. त्यामुळे जर असे प्रकल्प सर्वत्र राबवले, तर काही अंशी हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी गरज आहे ती तुमच्या आमच्या प्रयत्नांची.

अशाच प्रकारे प्रयत्न करून कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग मुलुंडमधील काही नागरिकांनी सुरू केला आहे. हरियाली संस्थेच्या माध्यमातून मुलुंडमधील 40 रहिवासी संकुलात कंपोस्ट खताचे प्रकल्प राबवण्यात आले आहेत. महिन्यातून 5 टन कचऱ्यावर वर्मीकंपोस्ट आणि बायोकंपोस्ट प्रक्रिया करून खत बनवले जाते.

रहिवासी संकुलात काम करताना ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करून त्या संकुलाच्या परिसरात असलेल्या कंपोस्ट खतासाठी बनविलेल्या प्रकल्पात टाकला जातो, अशी माहिती मुलुंडच्या उमया टॉवरमधील रहिवासी संकुलात साफ-सफाईचे काम करणाऱ्या इंदुमती कांबळे यांनी दिली. कालांतराने या कचऱ्याचे जैविक प्रक्रिया होऊन विघटन होते आणि त्याचीच खत निर्मिती होते, असेही त्या म्हणाल्या.

या कामात संकुलातील सर्व महिला देखील इंदुमती यांना मदत करतात. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. त्यानंतर हा कचरा कचराकुंड्यांत टाकला जातो. गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकल्प या संकुलात सुरू आहे. यातून तयार होणारे खत संकुलातील उद्यानांसाठी वापरले जाते. उरलेले खत शेजारच्या इमारतीत या महिला विकतात.

- प्रियंका मोकाशी, रहिवासी


हेही वाचा - 

स्वच्छतेला महत्व देत मकरंद सोसायटीने बनवले कचऱ्यापासून खत

वरळीच्या शिवालय सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मिती


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.