स्वच्छतेला महत्व देत मकरंद सोसायटीने बनवले कचऱ्यापासून खत

 Mumbai
स्वच्छतेला महत्व देत मकरंद सोसायटीने बनवले कचऱ्यापासून खत
Mumbai  -  

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी स्वच्छतेबाबत जगजागृती करणारे कार्यक्रम राबवण्यात आलेत. मात्र माहीम पश्चिमेतील मकरंद सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. 

नुसते महत्वच दिले जात नाही तर त्यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या सोसायटीमध्ये जो काही ओला आणि सुखा कचरा जमा होतो त्याचे योग्य नियोजन करून त्यापासून खत बनवले जाते. याच खताचा वापर सोसायटीतील झाडांना देखील केला जातो. त्यामुळे एकतर पालिकेला या सोसायटीकडून कमी कचरा दिला जातो आणि परिसरात झाडांच्या रुपाने हिरवळ आणि स्वच्छताही पहायला मिळते.

विशेष म्हणजे मकरंद सोसायटी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सरला पाटील आणि गंगू शिंदे या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. मकरंद सोसायटीमध्ये 6 इमारती आहेत. ज्यामध्ये जवळपास 30 फ्लॅट आहेत तरी देखील येथे कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत असल्याची माहिती सिटीझन फोरमचे अध्यक्ष अशोक रावत यांनी दिली.

या सोयायटीमध्ये पाण्याचे झरे आहेत. या पाण्याचा उपयोग सोसाटीतील झाडांना वापरून ते इथल्या टॉयलेटमध्ये देखील वापरले जाते. जर अशा प्रकारे मुंबईतील सर्व सोसायट्यांनी कचऱ्याचे नियोजन केले तर आपली मुंबई सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.
अशोक रावत, अध्यक्ष सिटीझन फोरम

Loading Comments