Advertisement

२७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत मुसळधार पाऊस, IMD कडून इशारा

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईच्या हवामानात दिसून येईल.

२७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत मुसळधार पाऊस, IMD कडून इशारा
SHARES

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईच्या हवामानात दिसून येईल. २७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत मुंबईकरांना सतर्क करण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबासह राजस्थान आणि छत्तीसगडवर घोंघावत असलेल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरही परिणाम करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परिणाम राज्यावर दिसून येईल. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग आयएमडी मुंबईच्या हवामान अधिकारी शुभांगी भुते यांनी ही माहिती दिली.

हवामान विभागाच्या मते, येत्या १२ तासात मुंबई आणि महाराष्ट्रात वादळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसून येईल. पावसाची तीव्रता २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राहील.

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव २६ सप्टेंबरपासून मुंबईत दिसून येईल. रविवारी हलका पाऊस पडेल पण मंगळवारी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मुंबईत वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल.

हवामान विभागानं महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी देखील खोल समुद्रात जाण्याबाबत इशारा दिला आहे. ४५-५० किमी प्रतितास वेगानं वाहणारा वारा ६० किमी प्रतितास वेगाने वेगाने वाहण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

दिल्ली, अहमदाबादची हवा मुंबईपेक्षा जास्त विषारी

खारफुटी क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा