Advertisement

cyclone tauktae : समुद्रात अडकलेलं जहाज बुडालं, २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ येथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र आहे. येथे ओएनजीसीचं जहाज पी ३०५ उभं होतं.

cyclone tauktae : समुद्रात अडकलेलं जहाज बुडालं, २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश
SHARES

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे दोन जहाजं मुंबईपासून १७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'हीरा ऑईल फील्ड्स'जवळ अडकली होती. मंगळवारी यातील  ओएनजीसीचं पी-३०५ नावाचे जहाज बुडालं आहे. या जहाजावर २७३ लोकं होती. यातील १४६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर १३० जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने आयएनएस कोच्ची आणि आयएनएस तलवारला पाठवलं आहे.

रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ येथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र आहे. येथे ओएनजीसीचं जहाज पी ३०५ उभं होतं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज बुडायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटलं जातं) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला युद्धनौका पाठवण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, दुसरे एक जहाजही समुद्रात अडकले आहे. त्या जहाजाला वाचवण्यासाठी आयएनएस कोलकाताला पाठवण्यात आले आहे. त्या जहाजावर १३७ जण असून, आतापर्यंत ३८ जणांना वाचवण्यात आले आहे.

भारतीय नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, ‘मुंबई हाय परिसरात असलेल्या हीरा ऑईल फील्ड जवळ अडकलेल्या पी-३०५ जहाजाच्या मदतीसाठी आयएनएस कोच्चीला पाठवण्यात आले आहे. आयएनएस तलवारदेखील शोध आणि बचावकार्यासाठी तैनात आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा